शिर्डी / प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय असा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. सावळीविहिर खुर्द गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या भव्य प्रांगणात विविध वृक्षांच्या साक्षीने गावातून शाळेपर्यंत वृक्षदिंडी काढून श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट,शिर्डी व साई 9 ग्रुप च्या वतीने शाळेत व गावात भव्य वृक्षारोपनाचा कार्यकम आयोजित करुन साजरा करण्यात आला.
यावेळी श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट,शिर्डी च्या ट्रस्टी श्रीमती संगीता अरूणराव गायकवाड यांनी वृक्ष लागवड करुन शाळेतील लहान मुलाना झाडांचे महत्व संगितले.
जो झाड लावतो तो एक आशा लावतो असा संदेश त्यांनी यावेळी मुलांना दिला. वृक्ष लागवड ही आम्ही निरंतर चालू ठेवली असुन गावागावात त्याचा प्रचार करुन कोविड काळात सोशल नियमांचे पालन करुन सदर कार्यक्रम उत्साहाने पार पडले असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली. प्रसंगी ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या विश्वस्त संगीता अरूणराव गायकवाड , साई 9 ग्रुप चे संचालक साईराज गायकवाड, स्नेहल गायकवाड,यशराज गायकवाड, यश राजपूत, किरण पारखे तसेच सावळविहिर खुर्द गावचे सरपंच अशोक जमधडे, सपनाताई सुधीर वर्पे , उपसरपंच, महेश जमधडे , सदस्य दत्तात्रय क्षीरसागर , शरद भदे, सुधाकर चव्हाण माजी सरपंच , संदिप आरणे, सुधीर वर्पे,श्रीमती टेमक, ग्रामसेविका श्रीमती सांगळे , संजय त्रिभुवन , विलास आगलावे , दत्तात्रय खंडिझोड सर ,संदीप गाडे , व ग्रामस्थ उपस्थीत होते

No comments:
Post a Comment