शिर्डीत श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्या वतीने 22 वा साई- लक्ष्मी यज्ञ मोठ्या उत्साहात संपन्न - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 17, 2022

शिर्डीत श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्या वतीने 22 वा साई- लक्ष्मी यज्ञ मोठ्या उत्साहात संपन्न


शिर्डी / प्रतिनिधी 
साईबाबांच्या पावनभूमीत सालाबादप्रमाणे  या वर्षीही   शिर्डी येथील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्या वतीने मकर संक्रांती च्या शुभ मुहूर्तावर 22 वा साई लक्ष्मी यज्ञ मोठ्या भक्तीभावात पार  पडला. गेल्या 21 वर्षा पासुन हा सोहळा अविरतपणे सुरु असुन यंदाचे  हे 22 वे वर्ष आहे.दरवर्षी या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी डा परंतु कोरोना प्रादुर्भाव मुळे या वर्षी फक्त 27 जोडपे यज्ञ सोहळ्यात सहभागी झाले होते.
    श्री  साईबाबाच्या समाधीचे दर्शन  घेऊन बाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेल्या  दिव्य नऊ  नाण्याची मिरवणूक काढण्यात आली.श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी चे अध्यक्ष आ.  अशितोश काळे, विश्वस्त ,  डॉ.एकनाथराव गोंदकर,विश्वस्त महेंद्र  शेळके ,  विश्वस्त अविनाश दंडवते, विश्वस्त सुदामराव आहेर,  निलेश कोते , बाबासाहेब कोते , अजित पारख , 
जितेंद्र शेळके , अमोल वाघ आदीसह शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थीत होते. 
श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट चे  अध्यक्ष अरूण गायकवाड  सौ. संगीता गायकवाड  साई नाइन स्पोर्ट्स चे संचालक  साईराज गायकवाड सौ.स्नेहल गायकवाड  यांच्या हस्ते आलेल्या उपस्थित मान्यवरांचा यावे  सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री साईबाबा विश्वस्तव्यवस्था शिर्डी चे विश्वस्त म्हणाले, श्रवण कीर्तन, स्मरण, पाद, सेवन, अर्चन, वंदन,दास्य,सख्य,आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहे. या नऊ प्रकारास नवविधा भक्ती म्हणतात.
भक्तीच्या या प्रत्येक प्रकारामध्ये श्रेष्ठ फक्त ही होऊन गेले आहेत. त्यातीलच एक म्हणजे साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे आहे. पहीले तिन प्रकार परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास साहाय्यक ठरतात. पुढचे तीन  हे भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहेत आणि शेवटची तीन हे आंतरिक भाव असल्याचे त्यांनी सांगत ट्रस्टच्या माध्यमातून गायकवाड परिवारातर्फे  हा अभुतपूर्व  यज्ञ सोहळा अखंडपणे सुरू असून यानिमित्ताने साईबाबांचा  प्रचार प्रसार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे . शिर्ड़ीचे वेदशास्त्रसंपन्न वैभवशास्त्री रत्नपारखी यांनी सांगितले की साईबाबांनी परमभक्त लक्ष्मीबाई  शिंदे यांना नऊ नाणे दिले आहेत.त्याची जपणूक गायकवाड परिवाराने आजतागायत केली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी हा यज्ञ सोहळा आयोजित करण्यात येत असतो यासाठी मोठ्या प्रमाणावर साईभक्त यज्ञविधी साठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर  उपस्थितीत मान्यवरांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात  साईनामाच्या जयघोषात  हा साई लक्ष्मी  सोहळा संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages