मुख्यमंञी उध्दव ठाकरेंना केंद्रीय मंञी नारायण राणेंनी अपशब्द वापरल्याचा निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी , शिर्डी पोलिसांना शिवसेनेचे निवेदन - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 24, 2021

मुख्यमंञी उध्दव ठाकरेंना केंद्रीय मंञी नारायण राणेंनी अपशब्द वापरल्याचा निषेध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी , शिर्डी पोलिसांना शिवसेनेचे निवेदन

 रुपेश पोपटे / शिर्डी 



केंद्रित मंञी नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याने आज शिवसेना कार्येकर्तांनी त्यांचा  निषेध व्यक्त केला. शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदनला राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी यावेळी निवेदन देण्यात आले. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असुन ज्या शिवसेनेने तुम्हांला मोठ केले त्यांच्या विषयी अपशब्द वापरल्याने तुम्हाला फिरकू देणार नाही आणि शिवसेना योग्य ती भुमिका घेईल असे शिवसेनेचे संजय शिंदे यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला असुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंञी नारायण राणे यांनी जो अपशब्द वापरला त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिर्डी पोलिसांनी दिले असल्याचे सांगितले आहे. यावेळी शिवसेना नेते कमलाकर कोते , संजय शिंदे , सचिन कोते , विजय जगताप , आदीसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages