केंद्रीय मंञी राणेंवर कारवाईचा आ. राधाकृष्ण विखेंकडून निषेध - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 25, 2021

केंद्रीय मंञी राणेंवर कारवाईचा आ. राधाकृष्ण विखेंकडून निषेध


शिर्डी / प्रतिनिधी
केंद्रीय मंञी नारायण राणे यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याबाबद अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली ठिकठिकाणी आंदोलन तर राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान मंञी राणे यांना अटक होताच भाजपानेही मंञी राणे समर्थनार्थ आज ठिकठिकाणी महाविकासआघाडी सरकारचा निषेध व्यक्त करत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या उपस्थितीत निषेध सभा घेण्यात आली.यावेळी नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है असे फलक हातात धरुन निषेध  व्यक्त  करण्यात आला. यावेळी मविआ सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत असुन केंद्रीय मंञी नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई ही पोलिसांची मदत घेऊन आणि राजकीय दहशत पसरवणारी असुन ही कारवाई नियमबाह्य आहे यामुळे तातडीने गुन्हे मागे घ्या असे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. आज शिर्डी येथे या सुडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ सरकारचा निषेध व्यक्त करत असुन योग्य चौकशी करुन समंधीत अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणी आ. विखेंनी केली आहे.
या निषेध मोर्चा प्रसंगी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर , कैलासबापू कोते ,  उपनगराध्यक्ष सचिन कोते , रविंद्र गोंदकर , सचिन शिंदे , पोपट शिंदे , ज्ञानेश्वर गोंदकर , तुषार गोंदकर , आदीसह भाजपाचे कार्येकर्ते  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages