भाजपा किसान मोर्चाच्या राहाता तालुकाध्यक्ष पदी बाळासाहेब डांगे निवड - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 17, 2021

भाजपा किसान मोर्चाच्या राहाता तालुकाध्यक्ष पदी बाळासाहेब डांगे निवड



राहाता तालुका भाजपा किसान मोर्चाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असुन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले.  प्रसंगी राहाता तालुका भाजपा किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी डो-हाळे येथील सामाजिक कार्यकर्ते  बाळासाहेब पुंजा डांगे हे  गेले ३० वर्षापासुन ना. राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  शालिनीताई विखे पाटील , खा. सुजय विखे पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले  डो-हाळेचे उपसरपंच  बाळासाहेब डांगे यांची राहाता तालुका भाजपा किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दाखविलेल्या विश्वासाला तढा जाऊ देणार नाही असे नवनिर्वाचित भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष  बाळासाहेब पुंजा डांगे यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब डांगे  यांनी याधी डो-हाळे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून पद भूषविले आहे आज उपसरपंच म्हणून काम करत आहे तर  साईसिद्धी पतसंस्था शिर्डी येथे त्यांनी  व्हा चेअरमन म्हणून काम सांभाळले आहे.याप्रसंगी 
प्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष  सतिष कानवडे,भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष  राजेंद्र  गोंदकर,डो-हाळे ग्रामपंचायत चे सरपंच भाऊसाहेब डांगे, चेअरमन बाळासाहेब केकाणे, गणेशचे संचालक  सुदाम सरोदे, राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा. संचालक नानासाहेब  डांगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages