रस्तालुट करणाऱ्या आठ चोरट्यांची पोलीसांना हुलकावणी , राञभर शोध घेऊनही चोरटे माञ फरार - dailysaisandhya

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 17, 2021

रस्तालुट करणाऱ्या आठ चोरट्यांची पोलीसांना हुलकावणी , राञभर शोध घेऊनही चोरटे माञ फरार

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 
रविवारी मध्यरात्री नगर-मनमाड महामार्गावर रस्तालूट करणाऱ्या  सशस्त्र टोळीने धुमाकुळ घातला.कृषी विद्यापीठ परीसरात बेलापूर येथिल एकास शस्ञाचा धाक दाखवून लुटले.हि घटना समजताच राहुरी पोलीस सतर्क झाले.गस्तीवरील पोलीसांनी नांदगाव शिंगवे ते कोल्हार खुर्द या मार्गावरील गस्त वाढविण्यात आली.राञभर या मार्गावर पोलीसांची वाहने गस्त घालीत होती. तांभेरे रस्त्यावर  पोलीसांच्या एका वाहनाने चोरट्यांच्या दुचाकीला धडक दिली. परंतू या धडकेतुन चारही चोरट्यांनी स्वतःला सावरीत दोन्ही दुचाक्या जागेवरच सोडुन देत अंधाराचा फायदा घेऊन पळून  जाण्यात यशस्वी झाले.रविवारी रात्री सव्वादहा वाजता नगर-मनमाड महामार्गावर कृषी विद्यापीठ परीसरात दुचाकीस्वार अशोक भाऊसाहेब गायकवाड (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी अडविले. यातील एका चोरट्याने गायकवाड यांना धारदार शस्ञाचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील रोख दहा हजार रुपये व एक मोबाईल लुटुन नेला. रस्तालुटीची घटना पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना समजताच त्यांनी गस्तीवरील पथकास सावधान करुन सुचना दिल्या.नगर मनमाड महामार्गा वरील गुहा पाट येथुन पंढरपूर येथुन देवदर्शन घेवून या मार्गाने जात असताना भाविकांचे वाहन गुहा पाटावर अडविण्यात आले. दोन दुचाकींवरील चार ते पाच  चोरट्यांनी शस्ञाचा धाक दाखवत अडविले त्यावेळी राञीचे एक वाजला असेल भाविकांना लुटण्याचा प्रयत्न करीत असताना स्थानिक रहिवाशी व आसपासचे नागरिक मदतीला धावल्याने रस्तालुट करणारे पळून  गेले.रस्तालुटीच्या दुसऱ्या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना समजताच त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंह रजपूत, उपनिरीक्षक नीरज बोकील, उपनिरीक्षक तुषार धाकराव, उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ यांच्यासह 30 पोलीस कर्मचाऱ्यांचे पथके तयार करुन, खाजगी वाहने, दोन सरकारी वाहने व पाच सहा दुचाकींवरून नगर-मनमाड महामार्गावर पोलीसांचे पथके उतरली. पोलीसांच्या पथकासमोर रात्री एक ते दोनच्या दरम्यान तांभेरे रस्त्यावर रस्तालुट करणारे चोरटे समोर आले. पथकातील उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या चालकाने दुचाकीवरील चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. एका दुचाकीला पोलीसांच्या वाहनाने धक्का दिला. दुचाकीवरील चोरटे खाली पडले.पोलीस वाहनातून उतरेपर्यंत चोरट्यांनी स्वतःला सावरीत दोन्ही दुचाकी सोडून चार चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेवून ते पळून गेले. पोलिसांनी दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या असुध पोलीसांनी राञभर गस्त घातल्याने रस्तालुटीच्या घटना टळल्या आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages