वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे आयोजन; रक्तदात्याचा २ लाखाचा अपघाती विमा उतरविणार
आंबी : राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, राहुरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त रविवार दि १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताची नितांत गरज असल्याने आसरा फाउंडेशन, बारामती यांच्या सहकार्याने वैष्णवी चौक, राहुरी फॅक्टरी येथे रविवार सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ होणार असून या शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष सत्यजीत कदम, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, तहसीलदार एफ.आर.शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, मुख्याधिकारी अजित निकत, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, तालुकाध्यक्ष गोविंद फुणगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सकाळी ९ ते ४ यावेळेत रक्तदान प्रकिया पार पडणार असून या रक्तदान कार्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान व महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे
“रक्तदात्याचा २ लाखांचा अपघाती विमा”
या शिबीरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एका वर्षासाठी २ लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात येणार असून रक्तदात्याने येताना आधारकार्ड, पॅनकार्ड झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून यावेत असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment